Gold Price Today : सोने खरेदीची सुवर्णसंधी! गौरी आगमनाच्या शुभ मुहूर्तावर किमती घटल्या

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | गौरी आगमनाच्या विशेष मुहूर्तावर आज सराफ बाजारातील सोन्या चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत. नाहीतर गेल्या रक्षाबंधन सणापासून सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या होत्या. मात्र आज याच किमतींमध्ये घट झाल्यामुळे ग्राहकांना सोन्याची खरेदी योग्यरीत्या करता येणार आहे. सणासुदीच्या काळात दागिन्यांच्या नवीन व्हरायटीज आल्यामुळे महिला वर्ग सोने खरेदी करण्यावर जास्त भर देत आहे. त्यामुळे आजचा दिवस अशा महिलांसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी अगदी योग्य आहे.

गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) चांगलीच घसरण झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत गुरुवारी 55,050 रुपयांनी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्याचबरोबर MCX वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,050 रुपये असाच सुरू आहे तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,050 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडू शकते.

 

Gold Price Today
Gold Price Today

गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 55,050 रुपये
मुंबई – 55,050 रुपये
नागपूर – 55,050 रूपये

24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)

पुणे- 60,050 रूपये
मुंबई – 60,050 रूपये
नागपूर – 60,050 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे आजचे भाव

सोन्यासोबत गुरूवारी चांदीच्या किमती (Gold Price Today) देखील कमी झाल्या आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 745 रुपयांनी सुरू आहे. तर 100 ग्रॅम चांदी 74,500 रुपये भावाने विकली जात आहे. त्यामुळे आजचा दिवस सोन्या सोबत चांदीचे खरेदी करण्यासाठी देखील शुभ आहे. तसेच, सरासरीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

प्लॅटिनम किंमती

मुख्य म्हणजे, आज सोन्या-चांदीसोबत प्लॅटिनमच्या किमती देखील घसरल्या आहेत. आजच्या दिवशी 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24 हजार 630 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम प्लॅटिनम 2,46,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्लॅटिनम खरेदी करणे देखील फायदेशीर ठरू शकते.