Gold Price : सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज सोने किती स्वस्त झाले हे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच असतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यातही ही एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.25 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, चांदीचे भाव 0.21 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहेत.

विक्रमी उच्चांकापेक्षा 7100 रुपयांनी स्वस्त विक्री
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीने 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज डिसेंबर फ्युचर्स MCX वर सोने 49,091 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजून सुमारे 7109 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

पॉलिसी बाजार नुसार आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,290 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 66,825 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,290 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49530 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,340 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,340 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि 22 कॅरेट सोन्यामध्ये ९१.६६ टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोनेच घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47250 रुपये
पुणे – 46290 रुपये
नागपूर – 47,340 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48250 रुपये
पुणे – 46,300 रुपये
नागपूत – 48,340 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर 

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5048.00 Rs 4953.00 -1.918 %⌄
8 GRAM Rs 40384 Rs 39624 -1.918 %⌄
10 GRAM Rs 50480 Rs 49530 -1.918 %⌄
100 GRAM Rs 504800 Rs 495300 -1.918 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4715.00 Rs 4629.00 -1.858 %⌄
8 GRAM Rs 37720 Rs 37032 -1.858 %⌄
10 GRAM Rs 47150 Rs 46290 -1.858 %⌄
100 GRAM Rs 471500 Rs 462900 -1.858 %⌄

Leave a Comment