Gold Price : सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, किती स्वस्त झाले जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हीही लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण सोन्यासोबतच सध्या चांदीच्या दरातही जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. आज पुन्हा मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

आज सोने आणि चांदी किती स्वस्त झाले ते पहा
आज, फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX सोने 0.18 टक्क्यांनी घसरून 47,751 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 0.41 टक्क्यांच्या घसरणीसह 61,581 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

सोने 8,449 रुपयांनी स्वस्त झाले आहे
2020 बद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी याच कालावधीत MCX वर प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज ऑगस्ट फ्युचर्स MCX वर सोने 47,751 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8,449 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,870 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,000 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,000 रुपये
पुणे – 46,350 रुपये
नागपूर – 47,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -49,000 रुपये
पुणे – 48,870 रुपये
नागपूर -49,000 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4636.00 Rs 4637.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 37088 Rs 37096 0.022 %⌃
10 GRAM Rs 46360 Rs 46370 0.022 %⌃
100 GRAM Rs 463600 Rs 463700 0.022 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4888.00 Rs 4889.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 39104 Rs 39112 0.02 %⌃
10 GRAM Rs 48880 Rs 48890 0.02 %⌃
100 GRAM Rs 488800 Rs 488900 0.02 %⌃

Leave a Comment