Gold Price – सोन्याचे भाव वाढले तर चांदी घसरली, आजचे नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेले संकेत आणि कमकुवत डॉलरमुळे आज भारतात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. मल्टी-कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत 0.29 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. आज सकाळी 9.40 वाजता, सोन्याची फ्युचर्स किंमत प्रति 10 ग्रॅम रुपये 48,785 वर ट्रेड करत होती. त्याच वेळी, आज चांदीच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. कालच्या तुलनेत आज चांदीचा भाव 0.11 टक्क्यांनी घसरून 62,083 रुपये प्रति किलो झाला आहे.

सोने विक्रमी उच्चांकावरून 6,615 रुपयांनी घसरले
16 डिसेंबर रोजी 1.16 टक्क्यांच्या वाढीसह सोन्याचा फेब्रुवारीचा फ्युचर्स भाव 48,646 वर बंद झाला. त्याच वेळी, चांदीचा मार्च फ्युचर्स भाव 3.23 टक्क्यांच्या उसळीसह 62,151 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 55,400 रुपये होती. आजच्या किंमतीची सोन्याच्या ऑल टाईम हाय रेटशी तुलना केल्यास, सोने त्याच्या विक्रमी किमतीपासून 6,615 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,780 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,360 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,360 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,360 रुपये
पुणे – 46,500 रुपये
नागपूर – 47,360 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -48,360 रुपये
पुणे – 49,780 रुपये
नागपूर – 48,360 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4649.00 Rs 4641.00 -0.172 %⌄
8 GRAM Rs 37192 Rs 37128 -0.172 %⌄
10 GRAM Rs 46490 Rs 46410 -0.172 %⌄
100 GRAM Rs 464900 Rs 464100 -0.172 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4977.00 Rs 4969.00 -0.161 %⌄
8 GRAM Rs 39816 Rs 39752 -0.161 %⌄
10 GRAM Rs 49770 Rs 49690 -0.161 %⌄
100 GRAM Rs 497700 Rs 496900 -0.161 %⌄

Leave a Comment