Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दर साप्ताहिकरीत्या महागले आहे तर चांदी मात्र स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 90 रुपयांची किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे तर चांदीच्या दरात 957 रुपयांची घट झाल्याचे दिसून आले आहे. IBJA च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (12 डिसेंबर ते 16 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 53,908 होता, जो शुक्रवारपर्यंत 53,998 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका वाढला आहे. त्याच वेळी, 999 शुद्ध चांदीची किंमत 67,022 रुपयांवरून 66,065 रुपये प्रति किलोवर आली आहे. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

12 डिसेंबर 2022 – 53,908 रुपये प्रति 10 ग्रॅम
13 डिसेंबर 2022 – 54,030 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 डिसेंबर 2022 – 54,386 रुपये प्रति 10 ग्रॅम
15 डिसेंबर 2022 – 53,894 रुपये प्रति 10 ग्रॅम
16 डिसेंबर 2022 – 53,998 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

12 डिसेंबर 2022 – 67,022 रुपये प्रति किलो
13 डिसेंबर 2022 – 67,161 रुपये प्रति किलो
14 डिसेंबर 2022 – 67,642 रुपये प्रति किलो
15 डिसेंबर 2022 – 66,568 रुपये प्रति किलो
16 डिसेंबर 2022 – 66,065 रुपये प्रति किलो

सोन्याच्या आयातीत झाली घट

हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या आयातीत घट झाली आहे. या कालावधीत सोन्याच्या आयातीत 18.13 टक्क्यांची घट नोंदवली गेली आणि ती 27.21 अब्ज डॉलरवर आली. Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
BSNL मध्ये होणार मोठा बदल; सरकारने बनवलाय जबरदस्त प्लॅन
आपल्यालाही SBI खात्यातून पैसे कट झाल्याचा एसएमएस मिळाला आहे ??? जाणून घ्या यामागील कारण
Kotak Mahindra Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 7 दिवसांत तिसऱ्यांदा FD वरील व्याजदरात केली वाढ
लवकरच लॉन्च होणार स्वस्त Electric Bike, एका चार्जिंगमध्ये मिळेल 135KM रेंज