हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank: RBI कडून रेपो दरात आतापर्यंत 5 वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता खासगी क्षेत्रातील Kotak Mahindra Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या FD वरील व्याजदरात सात दिवसांत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. या बदलानंतर, बँक सध्या FD वर जास्तीत जास्त 7.50 टक्के व्याज देत आहे. बँकेने काही FD योजनांवरील व्याजात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे.
15 डिसेंबर 2022 पासून नवीन दर लागू
Kotak Mahindra Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 15 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदला नंतर आता बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर 2.75% व्याज देत आहे. बँक आता 390 दिवसांच्या एफडीवर 7 % दराने व्याज देत आहे.
Kotak Mahindra Bank च्या एफडीचे नवीन दर
Kotak Mahindra Bank आता 7 ते 14 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्यांना 2.75 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.25 टक्के व्याज देत आहे. त्याचबरोबर 15-30 दिवसांसाठी सर्वसामान्यांना 3 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के दराने व्याज दिले जात आहे. त्याचप्रमाणे, 390 दिवसांच्या (12 महिने 25 दिवस) FD वर सर्वसामान्यांना 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज देत आहे. आता 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वर बँक सर्वसामान्यांना 6.20 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 6.70 टक्के व्याज देत आहे. .
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
RBI कडून रेपो दरात वाढ
अलीकडेच, RBI ने डिसेंबरच्या धोरणात रेपो दरात आणखी 0.35 टक्क्यांनी वाढ आहे. या दरवाढीनंतर, रेपो दर आता 6.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit/fixed-deposit-interest-rate.html
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे