Gold Price : आठवड्याभरात सोने-चांदी महागले, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 729 रुपयांची तर चांदीच्या दरात 1,390 रुपयांची वाढ नोंदवली आहे. IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी) 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा दर 57,079 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 57,788 रुपये 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 68,149 रुपयांवरून 69,539 रुपये प्रति किलो झाली आहे. Gold Price

Gold Price Today 3 October: दशहरे से पहले सोने की कीमत में उछाल, जानें अपने  शहर का हाल

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold prices today fall to near 1-year lows. In India, rates dip below  ₹50,000 | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

30 जानेवारी 2022 – 57,079 रुपये प्रति 10 ग्रॅम
31 जानेवारी 2022 – 56,865 रुपये प्रति 10 ग्रॅम
01 फेब्रुवारी 2022 – 57,910 रुपये प्रति 10 ग्रॅम
02 फेब्रुवारी 2022 – 58,882 रुपये प्रति 10 ग्रॅम
03 फेब्रुवारी 2022 – 57,788 रुपये प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

30 जानेवारी 2022 – 68,149 रुपये प्रति किलो
31 जानेवारी 2022 – 67,671 रुपये प्रति किलो
01 फेब्रुवारी 2022 – 69,445 रुपये प्रति किलो
02 फेब्रुवारी 2022 – 71,576 रुपये प्रति किलो
03 फेब्रुवारी 2022 – 69,539 रुपये प्रति किलो

यंदाच्या अर्थसंकल्पाने जेम्स आणि ज्वेलरी इंडस्ट्री नाराज

जेम्स आणि ज्वेलरी इंडस्ट्रीने बुधवारी म्हंटले की,” 2023-24 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे ते निराश झाले आहेत कारण सरकारने कस्टम ड्युटी 10 टक्के कायम ठेवली आहे. त्यामुळे काळाबाजाराला चालना मिळेल. यामुळे रत्ने आणि दागिने उद्योगाचे गंभीर नुकसान होईल” Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/

हे पण वाचा :
New Business Idea : फर्निचरच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये !!!
Jio च्या ‘या’ नवीन प्लॅनमध्ये 252 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळणार डेली 2.5GB डेटा
FD Rates : ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट, FD वर देत आहेत जबरदस्त ऑफर
Doorstep Banking म्हणजे काय ??? त्याचा फायदा कोणाकोणाला मिळेल ते जाणून घ्या
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!! आता ‘या’ लोकांना ITR मधून मिळणार सूट