Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात साप्तहिकरीत्या वाढ, गेले आठवडाभर सराफा बाजाराची स्थिती कशी होती ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे. त्याचप्रमाणे चांदीही महागली आहे. या आठवड्यात सोन्यामध्ये प्रति 10 ग्रॅम 1,378 रुपये तर चांदीमध्ये प्रति किलो 3,531 रुपयांची वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीलाच (3 ते 7 ऑक्टोबर) 50,387 रुपयांवर असलेला 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारपर्यंत 51,765 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 57,317 रुपयांवरून 60,848 रुपये प्रति किलो झाली. Gold Price

Gold discount in India falls despite prices rising over over 1-month high | Mint

इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price

Gold rates in India near lowest in 3 months | Mint

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)

03 ऑक्टोबर 2022- 50,387 रुपये प्रति 10 ग्रॅम
04 ऑक्टोबर 2022- रुपये 51,286 प्रति 10 ग्रॅम
05 ऑक्टोबर 2022 – बाजार सुट्टी
06 ऑक्टोबर 2022- रुपये 51,838 प्रति 10 ग्रॅम
07 ऑक्टोबर 2022- रुपये 51,765 प्रति 10 ग्रॅम

Designer Jewelry | Artisan Jewelry | Roma Jewelry

गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)

03 ऑक्टोबर 2022- रुपये 57,317 प्रति किलो
04 ऑक्टोबर 2022- रुपये 61,034 प्रति किलो
05 ऑक्टोबर 2022 – बाजार सुट्टी
06 ऑक्टोबर 2022- 60,670 रुपये प्रति किलो
07 ऑक्टोबर 2022- 60,848 रुपये प्रति किलो

सोन्याच्या साठ्यामध्ये घट

30 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 28.1 कोटी डॉलर्सने घसरून 37.605 अब्ज डॉलर्स झाले. तसेच 23 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यातील सोन्याच्या साठ्याचे मूल्य 37.886 अब्ज डॉलर्स होते. 16 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 45.8 कोटी डॉलर्सने घसरून 38.186 अब्ज डॉलर्स झाले. तर 9 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 34 डॉलर्सने वाढून 38.64 अब्ज डॉलर्स झाला होता. Gold Price

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://ibjarates.com/

हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद