Gold Price Hike: निवडणुकीनंतर सोन्याचे भाव 70 हजारांपर्यंत वाढणार; ग्राहकांना बसणार फटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशातील सर्वच राज्यांमध्ये आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे सोने चांदीच्या (Gold Silver Price) भावांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. मंगळवारी सोन्याचे भाव 64 हजार रुपयांच्या वर गेले आहेत. सोन्याच्या या किमतींमध्ये पुढे देखील वाढ होत राहील अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे आता सोन्याचे दर 70 हजारांपर्यंत पोहोचतील, असे गृहीत धरण्यात आले आहेत. ज्यामुळे याचा सर्वात मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.

या कारणामुळे सोने चांदीचे भाव वाढतील

मुख्य म्हणजे, देशातील स्थिर सरकार आणि अमेरिकन हे दोन प्रमुख कारणे सोन्याच्या किमती वाढण्यामागे आहेत असे तज्ञांनी म्हटले आहे. परंतु येत्या एक मे रोजी अमेरिकन बँक व्याजदरामध्ये मोठी कपात करू शकते असे संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात महागाई मध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम आपल्याला सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील दिसून येईल. विशेष म्हणजे मे मध्ये अक्षय तृतीया असतानाच सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार आहे.

तज्ञांनी बांधलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन महिन्यात सोन्याच्या किमतीत (Gold Price Hike) आठ टक्क्यांनी वाढू शकतात. सध्या सोन्याच्या किमतींमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाली आहे. येत्या काळामध्ये देशांमध्ये लोकसभा निवडणुका देखील लागणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत महागाई ते सोन्या- चांदीच्या किंमतीपर्यंत दिसून येईल. पुढील काही महिन्यांमध्ये या लोकसभा निवडणुका पार पडल्या की सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दुपटीने वाढ होऊ शकते. याचा परिणाम आपल्याला आतापासूनच दिसायला सुरुवात झाली आहे.

लोकसभा निवडणुकांचा परिणाम (Gold Price Hike)

दरम्यान, दरम्यान काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर स्थिर सरकार सत्तेमध्ये येईल. यामुळे काही महिन्यांमध्ये आर्थिक स्थिती देखील सुधारू शकते. याबरोबर आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचा आणि वर्षाचा आर्थिक डेटा एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सादर केला जाईल. यावरूनच महागाईचा अंदाज सर्वसामान्य नागरिकांना येईल. मुख्य म्हणजे या निवडणुका पार पडल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात देखील वाढ होऊ शकते.