हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Gold Price In 2026 । भारतात सोन्याची मागणी सातत्याने वाढत आहे. सोन्याच्या भाव कितीही जास्त असला तरी लग्न समारंभ असो किंवा इतर कोणते शुभ कार्य असो.. सोने खरेदी हि करावीच लागते. २०२५ मध्ये सोन्याच्या किमतीत ६० टक्क्यांहून अधिक विक्रमी वाढ झाली. यामुळे यंदा सोने खरेदीदार ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला. सोन्याचे दर कमी कधी होणार? या विचारात सर्वसामान्य माणूस आहे. मात्र याच माणसाला धक्का बसणारी बातमी आता समोर येतेय. येत्या वर्षात म्हणजे २०२६ मध्ये सोन्याची किंमत २ लाखांच्या आसपास जाऊ शकते असं बोललं जात आहे.
याबाबत वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी त्यांच्या ताज्या विधानात म्हटले आहे की सोन्याच्या किमतीतील अनेक वर्षांची तेजी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. २०२६ मध्ये सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीपेक्षा अंदाजे ३९ टक्क्यांनी वाढू शकतात. जर असे झाले तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत $६,००० च्या वर जाऊ शकते. भारतीय रुपयांमध्ये सोने १.९० लाख रुपयांच्या वर जाऊ शकते. याचा अर्थ असा की आगामी काळात सुद्धा सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. Gold Price In 2026
सोन्याचे भाव का वाढतायत ? Gold Price In 2026
डेव्हिड टेट यांनी सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात होत असलेली वाढ ही अल्पकालीन चढ-उतार नाहीये. दीर्घकालीन आणि संरचनात्मक कारणांमुळे सोन्याचे रेट वाढत आहेत. सोन्याच्या किमती आणखी महाग होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वात मोठी कारणे म्हणजे महागाईचा दबाव, भू-राजकीय तणाव, सुरक्षित-निवासस्थानांची मागणी आणि मध्यवर्ती बँकेची खरेदी, तसेच ETF मधील गुंतवणूक, जी सोन्याच्या किमतींमध्ये दिसून येऊ शकते . मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावरील सोनेखरेदी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून अधिक पसंती मिळत आहे असेही डेव्हिड टेट यांनी म्हंटल. एकूणच काय तर ज्याप्रमाणे 2025 मध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले अगदी त्याच प्रमाणे 2026 मध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळेल. यामुळे सर्वसामान्य माणसाचा खिसा मात्र चांगलाच फाटणार आहे हे मात्र नक्की.




