हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या आठवड्यात सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला होता. तसेच या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी तो 59,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. हे जाणून घ्या कि, गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी (शुक्रवारी) सोन्याचा भाव 58,159 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, या आठवड्यात सोन्याच्या किंमती उच्च पातळीवरून किंचित घसरल्या आहेत. तसेच हा आठवडाभर सोन्याच्या दरात चढ-उतार देखील पहायला मिळाले.
IBJA नुसार या आठवड्यातील सोन्याचा भाव खालीलप्रमाणे (Gold Price)
सोमवार – 59,671 रुपये प्रति 10 ग्रॅम
मंगळवार – 59,487 रुपये प्रति 10 ग्रॅम
बुधवार – 58,164 रुपये प्रति 10 ग्रॅम
गुरुवार – 59,192 रुपये प्रति 10 ग्रॅम
शुक्रवारी – 59,370 रुपये प्रति 10 ग्रॅम
सोने किती महागले ???
गेल्या आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 58,159 रुपयांवर बंद झाला होता. अशाप्रकारे या आठवड्यात सोन्याचा भाव 1,211 रुपयांनी महागला आहे. या आठवड्यात गुरुवारी सोन्याचा दर सर्वात कमी म्हणजेच 58,614 रुपये प्रति 10 ग्रॅम वर होता. त्याच वेळी, सोमवारी सोन्याचा दर सर्वात महाग म्हणजेच 59,671 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. Gold Price
सोन्याचे भाव का वाढले ???
अमेरिका आणि युरोपमध्ये सध्या बँकिंग संकट आले आहे. ज्यामुळे जगभरात आर्थिक मंदीचे सावट वाढले आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे जगभरातील केंद्रीय बँकांनी देखील मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी सुरू केली आहे. मार्केट एक्सपर्ट असलेल्या अनुज गुप्ता यांच्या मते, सोन्याच्या किमती वाढण्याची प्रमुख कारणे म्हणजे अमेरिका आणि इतर देशांमधील बँकिंग संकट, कमकुवत झालेली डॉलरची मागणी आणि शेअर बाजारातील अनिश्चितता. अशा परिस्थितीत सोन्यामधील गुंतवणूक झपाट्याने वाढली आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळेही त्याला सपोर्ट मिळाला आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
Ramgad : रत्नागिरी जिल्ह्यात सापडला नवीन किल्ला, याविषयीची सर्व माहिती जाणून घ्या
Bike : दुचाकीचे सेल्फ स्टार्ट खराब झाले तर किक न मारताही कशी सुरू करावी ते जाणून घ्या
Gold Loan : आपले दागिने दूर करतील पैशांची समस्या फक्त करावे लागेल ‘हे’ काम
शिक्षणासाठी ‘या’ सरकारी बँकांकडून सर्वात कमी व्याजदराने मिळेल Education Loan
खुशखबर !!! आता Bank of Baroda च्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया