हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदी स्वस्त झाली. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 149 रुपयांनी वाढ झाली तर चांदीच्या दरात 605 रुपयांची घट झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन अर्थात IBJA च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (18 ते 22 जुलै) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,667 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,816 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मात्र त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 55,614 रुपयांवरून 55,009 रुपये प्रति किलोवर आली आहे. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की, IBJA कडून जारी करण्यात आलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किमतीची माहिती देतात. IBGA ने जारी केलेले दर देशभरात सारखेच आहेत मात्र या किंमतींमध्ये GST चा समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले ते जाणून घ्या
18 जुलै 2022- 50,667 रुपये प्रति 10 ग्रॅम
19 जुलै 2022- 50,678 रुपये प्रति 10 ग्रॅम
20 जुलै 2022- 50,553 रुपये प्रति 10 ग्रॅम
21 जुलै 2022- रुपये 49,972 प्रति 10 ग्रॅम
22 जुलै 2022- 50,816 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यात चांदीचे दर किती बदलले ते जाणून घ्या
18 जुलै 2022- रुपये 55,614 प्रति 10 किलो
19 जुलै 2022- रुपये 55,563 प्रति 10 किलो
20 जुलै 2022- रुपये 55,367 प्रति 10 किलो
21 जुलै 2022- रुपये 53,907 प्रति 10 किलो
22 जुलै 2022- रुपये 55,009 प्रति 10 किलो
सोन्यावरील आयात शुल्क वाढले
केंद्र सरकारकडून नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात 5 टक्के वाढ केली गेली आहे. ज्यामुळे ते 7.5% वरून वाढून 12.5% करण्यात आले आहे. देशातील सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले गेले आहे. हे लक्षात घ्या की, 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जवळपास 55 टक्क्यांनी वाढून $39.15 अब्ज झाली आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
PNB कडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवीन दर तपासा
Railway कडून आज 221 गाड्या रद्द, संपूर्ण लिस्ट तपासा
ITR उशीरा भरला तरी ‘या’ लोकांना दंड लागणार नाही; जाणून घ्या आयकरशी संबंधित हा नियम
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, आजचे दर पहा