Simple One Electric Scooter : लवकरच बाजारात येणार Simple One इलेक्ट्रिक स्कुटर; 200 किमी पेक्षा जास्त Average

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या बाजारात इलेक्ट्रिक (Simple One Electric Scooter) वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर गतवर्षी 15 ऑगस्ट रोजी सिंपल एनर्जीने लॉन्च केलेल्या सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी लवकरच सुरू होणार आहे. जबरदस्त लूक आणि पॉवरफुल फीचर्ससह या इलेक्ट्रिक स्कूटरचे राइडिंग देशातील 13 शहरांमध्ये सुरू करण्यात आले आहे. या टेस्ट राइडनंतर ही स्कूटर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. चला जाणून घेऊया या इलेकट्रीक स्कुटर मध्ये नेमकं काय खास आहे.

लूक्स आणि फीचर्स- 

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरच्या (Simple One Electric Scooter) लुकबद्दल बोलायचे झाले तर, ही इलेक्ट्रिक स्कूटर खूपच स्पोर्टी आणि दिसायला थोडी हटके स्टाईलआहे. या स्कुटरचा हेडलॅम्प त्रिकोणी आकारात बसवलेला आहे. तसेच या इलेक्ट्रिक स्कुटरला LED टर्न इंडिकेटर, LED टेललॅम्प देखील आहेत. सिंपल वनची कंट्रोल बटणे सुंदर आणि मोठी आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 30-लिटर अंडर-सीट स्टोरेज, 7-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, OTA अपडेट्स, जिओ फेन्सिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह वाहन ट्रॅकिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि डॉक्यूमेंट स्टोरेजसह खास फीचर्स आहेत.

Simple One Electric Scooter

236 किमीपर्यंत एव्हरेज-

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरला 4.8kWh लिथियम-आयन बॅटरी आहे. बॅटरी रेंजबद्दल, सिंपल एनर्जी कंपनीचा दावा आहे की, बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केली तर ही इलेक्ट्रिक स्कूटर (Simple One Electric Scooter) इको मोडमध्ये 203 किमी आणि IDC कंडिशन मध्ये 236 किमीपर्यंत धावू शकते. Simple One चा टॉप स्पीड 105kmph आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एकत्रित ब्रेकिंग सिस्टम आणि फास्ट चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

Simple One इलेक्ट्रिक स्कुटर लवकरच बाजारात; 200 किमी पेक्षा जास्त average

 

काय आहे किंमत- (Simple One Electric Scooter)

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची (Simple One Electric Scooter) किंमत 1.09 लाख रुपये ते 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तुम्ही ही स्कूटर 1,947 रुपये टोकन रक्कम भरून बुक करू शकता. ही स्कूटर ब्लू, रेड, ग्रेस व्हाईट आणि ब्लॅक या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाईल. कंपनी तिच्या पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर तसेच बॅटरी आणि चार्जरवर तीन वर्षांची वॉरंटी देत ​​आहे.

Simple One Electric Scooter

देशातील 13 शहरांमध्ये टेस्ट राईड सुरु-

सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट राईड 20 जुलैपासून देशभरातील 13 शहरांमध्ये सुरु केली आहे. 20 ते 22 जुलै दरम्यान बेंगळुरूमध्ये टेस्ट राईड होत आहे. तर त्यांनतर चेन्नईमध्ये २६-२७ जुलै, हैदराबादमध्ये ३१ जुलै ते १ ऑगस्ट, पुणे आणि मुंबईमध्ये ५-६ ऑगस्ट, पणजी, गोवा येथे १०-११ ऑगस्ट, अहमदाबादमध्ये १५-१६ ऑगस्ट, २०-२१ ऑगस्ट कसोटी राइड झाली. 25-26 ऑगस्ट रोजी इंदूर, जयपूर, 30-31 ऑगस्ट रोजी दिल्ली-एनसीआर, 4-5 सप्टेंबर रोजी लखनौ, 9-10 सप्टेंबर रोजी पाटणा आणि शेवटी 14-15 सप्टेंबर रोजी भुवनेश्वर येथे टेस्ट राईड घेण्यात येईल.

हे पण वाचा : 

Ather 450x Gen 3 : Ather ने लॉंच केली दमदार इलेक्ट्रिक स्कुटर; पहा किंमत आणि फीचर्स

BMW G310 RR : BMWने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar N160 : बजाजची Pulsar N160 नुकतीच लॉंच; पहा किंमत आणि फीचर्स

Google Pixel 6a : भारतात लॉंच झाला गुगल Pixel 6a; किंमत आणि फीचर्स बद्दल जाणून घ्या

OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

Leave a Comment