हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी सोन्या आणि चांदीच्या दरात घट झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याच्या फेब्रुवारीच्या फ्युचर्स किमतींमध्ये 0.10 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीसह प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर आज 48,007 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीनंतर चांदीचा भाव 61,593 रुपयांवर आला आहे.
सोने आठ हजार रुपयांनी स्वस्त
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अशा स्थितीत सोन्याला मोठी मागणी आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सांगा की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने 8000 रुपयांनी स्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत अशा वेळी सोने खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याच वेळी, गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून सोने खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे. कारण तज्ञांच्या मते, लवकरच सोने महाग होईल आणि गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळू शकेल.
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,240 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,840 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,840 रुपये
पुणे – 46,240 रुपये
नागपूर – 47,840 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई -47,510 रुपये
पुणे – 49,550 रुपये
नागपूर – 47,840 रुपये
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4628.00 | Rs 4609.00 | -0.412 %⌄ |
8 GRAM | Rs 37024 | Rs 36872 | -0.412 %⌄ |
10 GRAM | Rs 46280 | Rs 46090 | -0.412 %⌄ |
100 GRAM | Rs 462800 | Rs 460900 | -0.412 %⌄ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4955.00 | Rs 4932.00 | -0.466 %⌄ |
8 GRAM | Rs 39640 | Rs 39456 | -0.466 %⌄ |
10 GRAM | Rs 49550 | Rs 49320 | -0.466 %⌄ |
100 GRAM | Rs 495500 | Rs 493200 | -0.466 %⌄ |