Gold Price Today | आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईनंतर सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीचे कमी झालेले भाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. गुरुवारी म्हणजेच आज सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तर चांदीच्या किमतींनी देखील उसळी मारली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने -चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. त्यासोबत प्लॅटिनमची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना देखील जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
गुरूवारी Good Returns नुसार, सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसघशीत वाढ झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,910 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,000 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,910 रुपयांनी व्यवहार करत आहे. म्हणजेच, आज दोन्ही वेबसाईटनुसार सराफ बाजारातील सोन्याच्या किमती वाढलेल्या (Gold Price Today) आहेत.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 54,000 रुपये
मुंबई – 54,000 रुपये
नागपूर – 54,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,910 रूपये
मुंबई – 58,910 रूपये
नागपूर – 58,910 रुपये
चांदीचे भाव
आज ग्राहकांना चांदीच्या भावात (Gold Price Today) देखील दिलासा मिळालेला नाही. गुरूवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 726 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,260 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 72,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील +5, +50, +500 अशा फरकाने वाढ झाली आहे.
प्लॅटिनमची किंमत
गुरूवारी प्लॅटिनमच्या किमती देखील महागल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,740 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,37,400 असा सुरू आहे. आज ऐन सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.