Gold Price Today| वाढत्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या भावात (Gold Price Today) सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परंतु आता ग्राहकांना दिलखुलासपणे सोन्या-चांदीची खरेदी करता येणार आहे. कारण आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरले आहेत. गेल्या महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतीने उच्चांकाची पातळी गाठली होती. त्यामुळे सोन्याच्या भावात कधी घसरण होईल, यासाठी ग्राहक प्रतीक्षेत होते. मात्र आता मंगळवारी ग्राहकांना योग्य दरात सोने खरेदी करता येणार आहे.
मंगळवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,840 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,840 रुपयांनी व्यवहार करत आहे. आजच्या सोन्याच्या किमती उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,600 रुपये
मुंबई – 57,600 रुपये
नागपूर – 57,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,840 रूपये
मुंबई – 62,840 रूपये
नागपूर – 62,840 रूपये
चांदीचे भाव
मंगळवारी सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीचे भाव स्थिर आहेत. सोमवारी चांदीच्या भावामध्ये वाढ झाली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा हेच भाव सम पातळीवर आहेत. 10 ग्रॅम चांदीचा भाव 755 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,550 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,500 रूपये अशी आहे.