Gold Price Today| डिसेंबर महिना संपला की तिथून पुढे लग्न सराईला सुरुवात होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यापासूनच सोने खरेदीवर जास्त भर देण्यात येतो. परंतु सध्या या काळातच सोन्याचे भाव गगनाला भिडल्याचे दिसत आहेत. आज पुन्हा एकदा म्हणजेच गुरुवारी सोन्याचे भाव 100 रुपयांनी वाढले आहेत. तसेच चांदीच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी सोने खरेदी करण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील सोन्याचे भाव नक्की तपासा.
Good Return नुसार गुरुवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,650 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,890 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,650 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,890 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे सध्या सोने खरेदी करणे ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,650 रुपये
मुंबई – 56,650 रुपये
नागपूर – 56,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,890 रूपये
मुंबई – 62,890 रूपये
नागपूर – 62,890 रूपये
चांदीचे भाव
गुरुवारी चांदीच्या भावात देखील लक्षणीय वाढ झाली आहे. 10 ग्रॅम चांदीचा भाव 775 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,750 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,500 अशी आहे. आज चांदीचे देखील भाव वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.