हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोन्या चांदीच्या वाढत्या भावांनी ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. कारण लग्नसराईच्या काळात ही सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. मात्र आज सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावांनी उच्चांकाची पातळी घातली आहे. त्यामुळे शनिवारी जे ग्राहक सोने खरेदी करण्यासाठी जातील, त्यांना सोने कमी दरात (Gold Price Today) तर चांदी जास्त किमतीत खरेदी करावे लागेल.
गुरूवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,590 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,100 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 60,590 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,100 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करणे परवडणार आहे. तर चांदीसाठी चार पैसे जास्त मोजावे लागणार आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,590 रुपये
मुंबई – 60,590 रुपये
नागपूर – 60,590 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 66,100 रूपये
मुंबई – 66,100 रूपये
नागपूर – 66,100 रूपये
चांदीचे आजचे भाव
आज सोन्याच्या भावात किंचित घसरण झाली असली तरी चांदीचा भाव वाढला आहे आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 773 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,730 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 77,300 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना चांदी खरेदी करताना मोठा फटका बसणार आहे.