Gold Price Today| दिवाळी सण निघून गेला तरी सोन्याच्या भावात ग्राहकांना दिलासा मिळालेला दिसत नाही. कारण, आज (शनिवारी) पुन्हा एकदा सोन्याच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला चांदीच्या किंमती घसरल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार होत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
आजचे गुड रिटर्न्सनुसार सोन्याचे भाव पाहता, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,550 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,690 रूपयांनी सुरू आहे. आज MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,950 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,040 रुपयांनी व्यवहार करत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,550 रुपये
मुंबई – 55,550 रुपये
नागपूर – 55,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,690 रूपये
मुंबई – 61,690 रूपये
नागपूर – 61,690 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या भावात घसरण झाली आहे. कारण की, 10 ग्रॅम चांदीचा भाव 760 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 76,000 रुपयांनी सुरू आहे. ज्यामुळे आजचा दिवस चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी मानला जात आहे.
दरम्यान, यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात अनेक सण समारंभ आल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत. परंतु असे असताना देखील लग्नसराईसाठी आणि सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. तसेच, चांदीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.