Gold Price Today| नव्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये देखील चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सराफ बाजारामध्ये सोन्याचे भाव 63हजारांच्या वर जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या सोने 62 हजारांवर व्यवहार करत आहे. आज या किमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. तसेच चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे आज सोन्या-चांदीचा व्यवहार करताना आजचे भाव तपासून घ्या.
शुक्रवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. यातूनच मागील किमतींमध्ये आणि आत्ताच्या किमतीमध्ये फरक पडल्याचे दिसत आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये
चांदीचे भाव
शुक्रवारी चांदीच्या भावांमध्ये हलकासा बदल झाल्याचे दिसत आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 757 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,570 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 75,700 अशी आहे. त्यामुळे आज चांदीची खरेदी करताना ग्राहकाला फटका बसू शकतो.
सोने खरेदी करताना शुद्धता तपासा
सराव बाजारात सोने खरेदी करायला गेल्यानंतर कधीही सोन्याची शुद्धता व्यवस्थित रित्या तपासावी. यासाठी सर्वात प्रथम दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते पहावे. कारण, 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणे नियमांच्या बाहेर बसते.