Gold Price Today: सोन्या चांदीच्या भावांनी गाठली उच्चांकाची पातळी; आजचे दर किती?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| दिवाळी सणाच्या काळामध्ये सोन्या – चांदीचे दर बऱ्यापैकी घसरले होते. मात्र आता याच दरांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. शनिवारी म्हणजेच आज सोन्याच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. तसेच चांदीच्या किमतीतही किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे अशा काळामध्ये ग्राहकांनी सोने खरेदी करावे की नाही याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासाठीच सर्वात प्रथम आजचे सोने चांदीचे भाव तपासणे गरजेचे आहे.

Good Return नुसार शनिवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,450 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,760 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,980 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 61,930 रुपयांनी व्यवहार करत आहे. या किमती पाहून आपल्याला अंदाज येऊ शकतो की, सध्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीनी उचांकाची पातळी गाठली आहे.

Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,450 रुपये
मुंबई – 58,450 रुपये
नागपूर – 58,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,760 रूपये
मुंबई – 63,760 रूपये
नागपूर – 63,760 रूपये

Gold Price Today

चांदीचे भाव

शनिवारी सोन्यासोबत चांदीच्या किमतींमध्ये देखील वाढ झाल्याचे दिसत आहे. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 805 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8050 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 80500 अशी आहे. गेल्या दोन महिन्यात चांदीच्या किमतीने पुन्हा एकदा ग्राहकांची निराशा केली आहे.

सोने खरेदीवेळी शुद्धता तपासा

सराव बाजारात सोने खरेदी करायला गेल्यानंतर कधीही सोन्याची शुद्धता व्यवस्थित रित्या तपासावी. यासाठी सर्वात प्रथम दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते पहावे. कारण, 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणे नियमांच्या बाहेर बसते.