हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| वाढत्या सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) भावांनी ग्राहकांच्या नाकीनऊ आणले आहेत. गेल्या एक महिन्यापासून सोन्या-चांदीच्या किमती उतरताना दिसत नाहीयेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. मात्र आज बऱ्याच दिवसानंतर सोन्या-चांदीच्या किमतीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. शुक्रवारी सराफ बाजारातील सोन्याचे भाव उतरले आहेत. या कारणामुळेच आजच्या दिवशी सराफ बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे.
शुक्रवारी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66,930 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 61,350 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 66,930 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना योग्य दरामध्ये सोन्याची खरेदी करता येणार आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,350 रुपये
मुंबई – 61,350 रुपये
नागपूर – 61,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 66,930 रूपये
मुंबई – 66,930 रूपये
नागपूर – 66,930 रूपये
चांदीचे आजचे भाव
खास गोष्ट म्हणजे, आज फक्त सोन्याचेच नाही तर चांदीचे भावही (Gold Price Today) उतरले आहेत. कारण की, आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,650 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,500 रूपये अशी आहे. मात्र पुढे जाऊन या भावांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते असा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे.