Gold Price Today| 2024 या नव्या वर्षाला सुरुवात होत असल्यामुळे ग्राहक सोने-चांदी खरेदीवर जास्त भर देताना दिसतायेत. परंतु अशा काळात सोन्या-चांदीचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगलीच खात्री बसत आहे. आज पुन्हा एकदा म्हणजेच शनिवारी सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांची निराशा झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोन्या चांदीचे भाव नक्की तपासा.
Good Return नुसार शनिवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,200 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,490 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,230 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोन्याचे दर कमी होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,200 रुपये
मुंबई – 58,200 रुपये
नागपूर – 58,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,490 रूपये
मुंबई – 63,490 रूपये
नागपूर – 63,490 रूपये
चांदीचे भाव
आज सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीचे भाव कमी झाले आहेत. कारण शनिवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 790 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,900 रुपये सुरू आहे. तसेच, 1000 ग्रॅम चांदीची किंमत 79,000 अशी आहे.