Gold Price Today| आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या महागाईमुळे सोन्या-चांदीच्या भावातही चढउतार पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा सोन्याचे भाव वाढले आहेत. तसेच चांदीच्या भागात देखील कोणतीही घट झालेली नाही. आजचे सोन्या – चांदीचे भाव पाहिले गेलो तर सोने 61 हजारांवर तर चांदी 700 रुपयांवर व्यवहार करत आहे. या कारणामुळे सध्या ग्राहकांचे सोने-चांदी खरेदी करणे मुश्किल होऊन बसले आहे. अशा काळात तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर सर्वात प्रथम आजचे भाव तपासून घ्या
ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे गुड रिटर्न्स आणि MCX वेबसाईट सोन्या-चांदीचे अचूक भाव सांगते. आपण या वेबसाईटनुसार आजच्या सोन्याच्या किमती पाहिला गेलो तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,800 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,970 रूपयांनी सुरू आहे. MCX वेबसाईटवर देखील सध्या सोन्याचे हेच भाव दाखवले जात आहेत. त्यामुळे आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की सोन्याच्या किमतीनी उचांकाची पातळी गाठली आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 56,800 रुपये
मुंबई – 56,800 रुपये
नागपूर – 56,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 61,970 रूपये
मुंबई – 61,970 रूपये
नागपूर – 61,970 रुपये
चांदीचे भाव
गुडरिटर्न्स शुक्रवारी चांदीच्या किमतीत ही घसरल झालेली नाही. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 762 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच , 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,620 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,200 अशी आहे. दिवाळी काळामध्ये चांदीचे हेच भाव 750,7550,7500 अशा किमतीत व्यवहार करत होते. परंतु आता या किमतीत मोठे बदल झालेले दिसत आहेत.
सोन्याची शुद्धता अशी तपासा
24 कॅरेट सोने हे पूर्णपणे शुद्ध असते. या सोन्यामध्ये कोणत्याही धातूचे मिश्रण करण्यात येत नाही. हे सोने अत्यंत मऊ आणि मुलायम असते. प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर असलेला हॉलमार्क शुद्धतेची गॅरंटी दर्शवते. यात एक क्रमांक असतो. यात पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून आपल्याला समजते की, विकत घेत असलेले सोने किती शुद्ध आहे.