Gold Price Today| गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. बचतीसाठी असो किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे जमवायचे असो यासाठी पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करण्यात येते. त्यामुळेच नेहमी सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आज तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर पहिले आजचे भाव तपासून घ्या. कारण आजच्या सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये (Gold Price Today) कोणताही बदल झालेला नाही.
गुरूवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,590 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,830 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,590 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,830 रुपयांनी व्यवहार करत आहे. म्हणजेच बुधवारी सोन्याच्या कमी झालेल्या किमती आजही कायम आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,590 रुपये
मुंबई – 57,590 रुपये
नागपूर – 57,590 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,830 रूपये
मुंबई – 62,830 रूपये
नागपूर – 62,830 रूपये
चांदीचे आजचे भाव
गुरुवारी फक्त सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या भावात देखील कोणताही बदल झालेला नाही. कारण आजही 10 ग्रॅम चांदीचा भाव 739 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,390 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 73,900 रूपये अशी आहे. त्यामुळे आजही ग्राहकांना योग्य दरामध्ये सोने-चांदीची (Gold Price Today) खरेदी करता येऊ शकते.