Gold Price Today : सणासुदीत सोन्या चांदीच्या किंमती नरमल्या; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव उतरले आहेत. त्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. सोन्याच्या किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली होती. मात्र आता मंगळवारी हेच भाव उतरल्यामुळे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारात गर्दी जमवली आहे.

Good Returns नुसार आज, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 61,580 रू. असा सुरू आहे. MCX नुसार, आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,190 रुपये अशी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,390 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज सोन्याचे भाव (Gold Price Today) उतरल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 56,700 रुपये
मुंबई – 56,700 रुपये
नागपूर – 56,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,580 रूपये
मुंबई – 61,580 रूपये
नागपूर – 61,580 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

मंगळवारी चांदीच्या किंमती (Gold Price Today) घसरल्या आहेत. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 753 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,530 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 75,300 रुपयांनी सुरू आहे. या कारणामुळे सराफ बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज सोन्याच्या किंमती उतरल्या असल्या तरी प्लॅटिनमच्या किंमती वाढल्या आहेत. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 24,890 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,48,900 असा सुरू आहे. आणि सणासुदीच्या काळात प्लॅटिनमच्या दागिन्यांची जास्त मागणी होत असताना प्लॅटिनमच्या किंमती वाढल्या आहेत.