Gold Price Today: मार्च महिना सुरू झाल्यापासून सोन्या – चांदीच्या भावात दररोज वाढ होत चालली आहे. आता ही वाढ एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील कायम आहे. 4 एप्रिल 2024 रोजी सोने 22 कॅरेट 10 ग्रॅम 64,600 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदी 10 ग्रॅम चांदी 820 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे सोन्या-चांदीचे हे भाव ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत. (Gold Price Today) तसेच या काळात सोने खरेदी केल्यास ग्राहकांना फटका बसू शकतो.
4 एप्रिल 2024 रोजी, Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64,600 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 70,470 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार देखील, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 64,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 70,470 रुपयांनी व्यवहार करत आहे. ऐन लग्न सराईच्या काळात सोने 70 हजारांच्या वर गेल्यामुळे ग्राहकांवर घाम फुटण्याची वेळ आली आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 64,600 रुपये
मुंबई – 64,600 रुपये
नागपूर – 64,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 70,470 रूपये
मुंबई – 70,470 रूपये
नागपूर – 70,470 रूपये
चांदीचे आजचे भाव
आज फक्त सोन्याच्या नाही तर चांदीच्या भावांनी (Gold Price Today) देखील ग्राहकांना झटका दिला आहे. कारण गुरुवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 820 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8200 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 82,000 रूपये अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदी करण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.