Gold Price Today| लग्नसराईच्या काळामध्ये सर्वात जास्त भर सोने खरेदी करण्यावर देण्यात येतो. परंतु सध्या सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत सोने खरेदी करावे का नाही? याबाबत ग्राहकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत सोने चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी त्यांचे भाव नक्की तपासा.
Good Return नुसार सोमवारी, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,850 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 64,200 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 59,330 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,300 रुपयांनी व्यवहार करत आहे. या किमती पाहून आपल्याला अंदाज येऊ शकतो की, सध्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीनी उचांकाची पातळी गाठली आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,850 रुपये
मुंबई – 58,850 रुपये
नागपूर – 58,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 64,200 रूपये
मुंबई – 64,200 रूपये
नागपूर – 64,200 रूपये
चांदीचा भाव
सोमवारी सोन्याच्या भावात नव्हे तर चांदीच्या भावात देखील वाढ झाली आहे. कारण, 10 ग्रॅम चांदीचा भाव 805 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 8050 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 80500 अशी आहे. त्यामुळे ग्राहकांचे सोनेच नव्हे तर चांदी खरेदी करणे हे अवघड झाले आहे.
सोने खरेदीवेळी शुद्धता तपासा
सराव बाजारात सोने खरेदी करायला गेल्यानंतर कधीही सोन्याची शुद्धता व्यवस्थित रित्या तपासावी. यासाठी सर्वात प्रथम दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते पहावे. कारण, 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकणे नियमांच्या बाहेर बसते.