Gold Price Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील होत आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 9 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर सोन्यासोबत चांदीच्या आणि प्लॅटिनमच्या किमतींनीही उसळी मारली आहे. तर मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सराफ बाजारातील ग्राहकांची वरदळ झाली आहे.
सोमवारी Good Returns नुसार, सोन्याच्या किंमती (Gold Price Today) उसळल्या आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,350 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,200 रूपये असा सुरू आहे. तर MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,150 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,980 रुपयांनी व्यवहार करत आहे. सोन्याच्या किमतींनी आज 53 हजारचा आकडा पार केल्यामुळे सोने ग्राहकांच्या खरेदी बाहेर गेले आहे.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 53,350 रुपये
मुंबई – 53,350 रुपये
नागपूर – 53,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 58,200 रूपये
मुंबई – 58,200 रूपये
नागपूर – 58,200 रुपये
चांदीचे भाव
आज सोन्यासोबत मौल्यवान चांदीच्या किमतीत (Gold Price Today) देखील वाढ झाली आहे. सोमवारी 10 ग्रॅम चांदीचा भाव 726 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,260 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 72,600 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात +5, +50, +500 अशा फरकाने वाढ झाली आहे.
प्लॅटिनमची किंमत
आज 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,620 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,36,200 असा सुरू आहे. त्यामुळे सोमवारी प्लॅटिनमच्या किमतीत देखील वाढ झाल्यामुळे ग्राहकांची मौल्यवान धातू खरेदीबाबत निराशा झाली आहे.