हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : भारतीय बाजारपेठेत आज पुन्हा एकदा सोन्या आणि चांदीच्या दरात चढ-उतार झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. मात्र आज सोने-चांदीची झळाळी पुन्हा एकदा वाढली आहे. जर आज आपण सोने-चांदी खरेदी करणार असाल तर आधी त्याचे सुधारित दर जाणून घ्या. हे लक्षात घ्या कि, शुक्रवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमती दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून वाढल्या आहेत.
MCX वर आज एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत रु. 55,525 प्रति 10 ग्रॅम वर उघडला. मात्र याच्या काही मिनिटांतच रु. 55,360 च्या इंट्राडे उच्च पातळीवर पोहोचला. मात्र, आज चांदीचा दर कमी झाला. त्याच प्रमाणे MCX वर आज चांदी 61,560 प्रति किलो या नीचांकावर घसरली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची स्पॉट प्राईस $ 0.14% च्या मजबूतीने $ 1,834.40 प्रति औंसवर तर चांदीची स्पॉट प्राईस 0.64 टक्क्यांनी घसरून $19.938 प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,870 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,870 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 53,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 57,870 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,050 रुपये
पुणे – 53,050 रुपये
नागपूर – 53,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 57,870 रुपये
पुणे – 57,870 रुपये
नागपूर – 57,870 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Multibagger Stocks : अवघ्या वर्षभरात ‘या’ 6 स्मॉल कॅप शेअर्सनी दिला दुप्पट रिटर्न
Digital Gold : आता फक्त 1 रुपयात खरेदी करता येईल सोने, जाणून घ्या त्यासाठीची प्रक्रिया
HDFC Bank ने ग्राहकांना दिला मोठा धक्का, ग्राहकांच्या EMI मध्ये झाली वाढ
SBI च्या सर्वोत्तम FD योजनेअंतर्गत ग्राहकांना दिला जातोय सर्वाधिक व्याज दर
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल