नवी दिल्ली । जागतिक बाजारपेठेतील घसरणीनंतर आज सोने-चांदी देखील स्वस्त झाली आहे. भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. MCX वरील सोन्याचे वायदे 1.5 टक्क्यांनी घसरून 47,799 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदी 1.6 टक्क्यांनी घसरून 70,345 रुपये प्रति किलो झाली. तज्ज्ञांचे मत आहे की, तांत्रिकदृष्ट्या MCX वर सोनं 47,700 ते 47,900 रुपयांपर्यंत आधार देऊ शकेल.
याशिवाय जागतिक बाजारपेठेबद्दल बोलताना अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने संकेत दिल्यानंतर रात्रीत सोन्याची अडीच टक्क्यांहून अधिकने घसरण झाली. तथापि, आज आशियाई व्यापारात सोन्याच्या किंमतींनी मागील दिवसातील तोटा कमी केला, गुंतवणूकदारांनी तीव्र घसरणीचा फायदा घेतला. येथील स्पॉट गोल्ड 0.6 टक्क्यांनी वधारला आणि 1,822.36 डॉलर प्रति औंस झाला. याशिवाय अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.5 टक्क्यांनी वाढून 27.09 डॉलर प्रति औंस झाली तर प्लॅटिनम 0.5 टक्क्यांनी वाढून 1,127.49 डॉलर झाला.
24 कॅरेट सोन्याची किंमत
17 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीतही घट झाली आहे. आज देशाची राजधानी दिल्लीत प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51590 रुपयांच्या जवळ आहे. याशिवाय चेन्नईमध्ये 49890 रुपये, मुंबईत 48400 रुपये, कोलकातामध्ये 51590 रुपये, बंगळुरुमध्ये 49460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.
डिसेंबरमध्ये 53,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते
मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, बाजारातील प्लेयर्सचे म्हणणे आहे की, सोन्याचे दर कंसोलिडेशनच्या कालावधीतून जात आहेत आणि पुढे ते प्रति 10 ग्रॅम 48,500 रुपयांच्या पातळीला पोहोचू शकतात. बुलियन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणत्याही घसरणी मध्ये सोन्यात गुंतवणूक करावी. 2021 च्या डिसेंबरअखेर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 53,500 रुपयांच्या पातळीला स्पर्श करू शकतात.
आपण सोन्याची शुद्धता कशी तपासू शकता
आता जर तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. ‘BIS Care app’ सह ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे आपण केवळ सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर त्यासंदर्भात कोणतीही तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याबद्दल त्वरित तक्रार करू शकेल. या अॅप (app) च्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा