Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं झालं स्वस्त; पहा आजच्या किंमती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : आज 1 मार्च असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी मोठी संधी आहे. आज 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या किमतीत 0.02% ने घसरण झाली असून प्रतितोळा 62552 रुपये दर झाला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीत प्रतिकिलो 300 रुपयांची वाढ झाली असून 1 किलो चांदीचा भाव 74,200 रुपये झाला आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सध्याचा काळ हा सणासुदीचा आणि लग्न सराईतीचा आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्याचे भाव (Gold Price Today) सातत्याने वरखाली जाताना दिसत आहेत. MCX वर आज सोन्याचा भाव सकाळी 62,567 रुपयांवर व्यवहार करत होता… त्यानंतर तो 62,544 पर्यंत निच्चांकी पातळीवर गेला. परंतु नंतर लगेचच त्यात थोडी वाढ होत सध्या १० वाजता सोने ६२,५६० रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर गुडरीटर्न नुसार, आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 5,7730 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 6,2980 रुपये आहे.

Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,580 रुपये
मुंबई – 57,580 रुपये
नागपूर – 57,580 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,820 रूपये
मुंबई – 62,820 रूपये
नागपूर – 62, 820रूपये

Gold Price Today

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.