Gold Price Today : युद्धजन्य वातावरणात सोन्याच्या किमती वाढल्या; आजचा दर इथे पहा

Gold Price Today
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोन्याच्या किमतीत वाढ (Gold Price Today) झाल्याचे पाहायला मिळाले. आज १० मे २०२५ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 96510 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.36% म्हणजेच ३४२ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात सुद्धा 19 रुपयांची किरकोळ वाढ झाल्याचे दिसत आहे. आज १ किलो चांदीचा भाव 96748 रुपये आहे. सोने- चांदीच्या किमतीत मागच्या काही महिन्यापासून अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत.

गुड रिटर्न वेबसाईट नुसारही, सोने महाग झाल्याचं दिसत आहे. १० ग्राम २२ कॅरेट सोन्याचा भाव 90,450 रुपये आहे तर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 98,680 रुपये आहे. दुसरीकडे गुड रिटर्न नुसार, १ किलो चांदीचा दर ९९००० रुपयांवर आहे. सध्याची भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती, अमेरिकेने लावलेले ट्रम्प टॅरिफ यामुळे सोने- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) आणखी काही बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्याच्या लग्न सराईतच्या काळात सोने खरेदीदार ग्राहकांनी सावधगिरीने सोने खरेदी करणं गरजेचं आहे.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 90450 रुपये
मुंबई – 90450 रुपये
नागपूर – 90450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 98680 रूपये
मुंबई – 98680 रूपये
नागपूर – 98680 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.