हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने आणि चांदीच्या किमतीतील दरवाढ (Gold Price Today) आजही सुरूच आहे. आज १२ एप्रिल २०२४ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या किमतीत 1.29% म्हणजेच तब्बल 926 रुपयांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे बाजारात एक तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत 72440 रुपये झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात सुद्धा तब्बल 1204 रुपयांनी वाढ झाली असून एक किलो चांदी प्रतिकिलो 84051 रुपये झाली आहे. या वाध्य किमतींमुळे सोने खरेदीदार ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहेत. त्यातच भर म्हणजे सध्या सर्वत्र लग्नसराईतचा काळ असल्याने सोन्याची मागणीही वाढत आहे.
MCX वर आज सकाळी ९ वाजता २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ७२२८० रुपयांवर सुरु झाला, मात्र थोड्याच वेळात हाच दर ७२४४३ रुपयांवर गेला. सोन्याची हि घोडदौड अशीच सुरु असून अत्ता १२ वाजता ७२४६८ रुपयांवर सोने व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वर सुद्धा सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गुडरीटर्न नुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 7,331० रुपये आहे. तर चांदीची किंमत ८६५०० रुपये प्रतिकिलो आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 67,200 रुपये
मुंबई – 67,200 रुपये
नागपूर – 67,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 73,310 रूपये
मुंबई – 73,310 रूपये
नागपूर – 73,310 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.