हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव (Gold Price Today) आकाशाला भिडले आहे. सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणे म्हणजे आवाक्याच्या बाहेर झाले आहे. पण सोन्याचे दर वाढण्याच्या आधी ज्यांनी सोने गुंतवणूक म्हणून खरेदी केले आहे त्यांची मात्र चांगलीच चांदी झाली आहे. सध्या हे गुंतवणूकदार चांगलेच फायद्यात आहे. सोन्याच्या दरात येणाऱ्या काळात चढ होईल की घट ? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. मात्र आजच्या दिवशी म्हणजेच १३ मे २०२५ रोजी सोने- चांदीच्या किमतीत वाढ झालेली बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे मागच्या २ दिवसांत सोने जवळपास ४००० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीही उसळी घेतलीय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 93209 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 308 रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीही 1402 रुपयांनी महाग झाली असून १ किलो चांदीचा भाव 96746 रुपयांवर व्यवहार करत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सकाळी ९ वाजता सोन्याचा बाजार ९२९४९ रुपयांपासून सुरु झाला. तेव्हापासून तो वाढतच चालला (Gold Price Today) … १० वाजून १५ मिनिटांनी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याच्या किमती 93195 रुपयांवर व्यवहार करत आहेत. तर गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९५६२० रुपये आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 87650 रुपये
मुंबई – 87650 रुपये
नागपूर – 87650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 95620 रूपये
मुंबई – 95620 रूपये
नागपूर – 95620 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




