Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याच्या किमतीमधील दरवाढ अजूनही सुरूच आहे. आज २ एप्रिल २०२४ रोजी २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव MCX वर 68635 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या दरात 0.54%म्हणजेच 372 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर गुड रीटर्नवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचे भाव 70,595 इतका आहे. सध्याच्या लग्नसराईटच्या काळात सोन्याच्या किमतीमधील या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र मोठी झळ बसत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज MCX वर सकाळी ९ वाजता सोन्याचा व्यवहार ६८५३९ रुपयांपासून सुरु झाला. नंतर थोड्याच वेळात सोन्याच्या किमतींनी उसळी घेत ६८५७७ वर गेल्या .. यानंतर सोन्याच्या दरातील वाढ सुरु राहिली असून ११ वाजता सोन्याच्या किमतींनी ६८६३५ रुपयांचा उच्चांक गाठला. आजचा दिवस संपेपर्यंत या दरात आणखी वाढ (Gold Price Today) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत सुद्धा आज 0.88% म्हणजेच 661 रुपयांची वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर 76193 रुपये आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 63,350 रुपये
मुंबई – 63,350 रुपये
नागपूर – 63,350 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 69,110 रूपये
मुंबई – 69,110 रूपये
नागपूर – 69,110 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.