Lemon Juice Side Effects | ‘हे’ 5 आजार असलेल्या लोकांनी चुकूनही पिऊ नका लिंबू पाणी, होईल मोठे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Lemon Juice Side Effects | उन्हाळा मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे. अगदी घरात बसून देखील खूप जास्त उष्णता जाणवते. उष्णता वाढली की आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. म्हणजेच आपले शरीर डीहायड्रेट होत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या शरीराचे हायड्रेशन जपणे खूप गरजेचे असते. या काळात जास्त पाणीयुक्त असलेले पदार्थ, फळे, भाज्या खाल्ल्या जातात. त्याचप्रमाणे ज्यूस, लिंबू पाणी यांसारखे घटक देखील मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. लिंबू पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्यात लिंबू पाणी अनेकजण पितात लिंबू पाण्याने (Lemon Juice Side Effects) आपली बॉडी डिटॉक्स होते आणि वजन कमी देखील होते.

लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्याचप्रमाणे त्यात चांगली रोगप्रतिकारशक्ती देखील असते. परंतु लिंबू हे आपल्या शरीरासाठी कितीही फायदेशीर असले, तरी असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी हे लिंबू पाणी पिणे खूप नुकसानदायक ठरू शकते. ज्या लोकांना काही विशिष्ट आजार आहेत. त्यांनी लिंबू पाणी पिणे घातक ठरेल. 9Lemon Juice Side Effects) त्यामुळे आपण आज जाणून घेऊया की कोणत्या लोकांनी लिंबू पाणी पिऊ नये.

ऍसिडिटी

ज्या लोकांना ऍसिडिटीची समस्या आहे. त्या लोकांनी जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिऊ नये. लिंबू पाण्यात सिट्रिक ऍसिड असते. त्यामुळे ऍसिडिटीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि पोटाशी संबंधित अनेक आजार देखील होतात.

दातांच्या समस्या | Lemon Juice Side Effects

ज्या लोकांना दाताशी काही समस्या आहेत. त्या लोकांनी देखील लिंबू पाणी पिऊ नये. लिंबात असलेले ऍसिड दातांमधील ऍनेमलला खराब करते. आणि दातांमध्ये सेन्सिटिव्हिटीची समस्या देखील उद्भवते. त्यामुळे जर तुम्हाला दाताशी निगडित काही समस्या असेल तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच लिंबू पाणी प्या.

हाडांशी संबंधित समस्या

ज्या लोकांना हाडांशी संबंधित काही समस्या असतील त्यांच्यासाठी देखील लिंबू पाणी पिणे हानिकारक ठरू शकते. जास्त प्रमाणात लिंबू पाणी पिल्याने हाडांना नुकसान पोहोचते. ॲसिडमुळे हाडातील जमा झालेले कॅल्शियम कमी होते आणि ते युरीनवाटे बाहेर पडते आणि हाडे आतून कमजोर होतात.

किडनीच्या समस्या

जा लोकांना किडनीशी संबंधित आजार आहेत. अशा लोकांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये. यामुळे किडनीवर जास्त दबाव येतो आणि आरोग्याशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीजने पीडित असलेल्या लोकांनी चुकूनही लिंबू पाण्याचे सेवन करू नये.