हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने आणि चांदीच्या दरवाढीचा (Gold Price Today) ट्रेंड आजही कायम राहिला आहे. भारतीय सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर ९२८५२ रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ८५११० रुपये प्रतितोळा आहे. चांदीच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत. देशात १ किलो चांदीचा भाव १,०५,१०० रुपये झाला आहे. सोने- चांदीच्या किमती दिवसेंदिवस बदलत असतात. मात्र ऐन लग्न सराईतच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र चाप बसलाय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ९१०१० रुपयांवरून सुरु झाला. १० वाजता सोन्याच्या किमतींनी ९०२४८ रुपयांचा निच्चांकी दर गाठला. त्यानंतर सोन्याची किंमत हळू हळू कमी जास्त होत राहिली. सध्या २४ कॅरेट १० ग्राम सोने ९०६३६ रुपयांवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये सोन्याच्या किमतीत दररोज चढ उतार बघायला मिळतात त्याचा परिणाम भारतीय बाजारात होतो. सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा योग्य पर्याय असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर (Gold Price Today) होताना दिसत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत मौल्यवान धातुच्या किंमती एक लाखांपर्यंत जाणार का, असा सवालही उपस्थित होताना दिसतोय.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 85100 रुपये
मुंबई – 85100 रुपये
नागपूर – 85100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 92840 रूपये
मुंबई – 92840 रूपये
नागपूर – 92840 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.