हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 92908 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.42% म्हणजेच 389 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. भारतीय सराफा बाजारात सोने चांदीच्या किमतीत सातत्याने चढ उतार पाहायला मिळते.
काल सोन्याचा व्यवहार ९३२९७ रुपयांवर बंद झाला होता. मात्र आज बाजार सुरु होताच या किमतीत (Gold Price Today) घसरून होऊन २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ९३००१ वर उघडला. १० वाजून ३० मिनिटांनी सोन्याच्या किमतीने ९३११५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. मात्र त्यानंतर या किमतीत घट होऊ लागली . सध्या १२ वाजून २५ मिनिटांनी सोने ९२८९७ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे १ किलो चांदीचा भाव 94984 रुपयांवर आला असून त्या किमतीत सुद्धा 469 रुपयांची घसरण बघायला मिळतेय.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 87100 रुपये
मुंबई – 87100 रुपये
नागपूर – 87100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 95020 रूपये
मुंबई – 95020 रूपये
नागपूर – 95020 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




