Gold Price Today : सोन्याचे दर सुसाट!! किंमती वाचूनच फुटेल घाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today : गेल्या काही महिन्यापासून सोने- चांदीच्या किमतीत सुरु असलेली दरवाढ अजूनही कायम आहे. त्यामुळे लग्नसराईतच्या या काळात सोने खरेदीदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. MCX वर आज २८ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोने 66482 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीत ०. २८ % म्हणजेच १८७ रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

MCX वर आज सकाळी ९ वाजता मार्केट सुरु होताच २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ६६४२३ रुपयांपासून सुरु झाला. त्यानंतर ११ वाजता यामध्ये वाढ होऊन सोन्याचा भाव ६६५५१ रुपयांवर (Gold Price Today) पोचला. त्यानंतर या किमतीत थोडी घट झाली आणि आता ११:४० च्या दरम्यान २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६६५६० रुपयांवर व्यवहार करत आहे. दर दुसरीकडे गुड रिटर्न नुसार, २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६७४६० रुपये आहे.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 61,700 रुपये
मुंबई – 61,700 रुपये
नागपूर – 61,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 67,310 रूपये
मुंबई – 67,310 रूपये
नागपूर – 67,310 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.