Gold Price Today । डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफचा परिणाम सोने- चांदीच्या किमतीवरही झाला आहे. आधीच भारतीय बाजारात सोने- चांदीच्या किमती गगनाला भिडल्यात. त्यातच आता ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्समुळे सोन्याचा भाव आणखी वाढला आहे. आज ४ एप्रिल २०२५ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १ तोळा २४ कॅरेट सोन्याचा दर 91050 रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत या किमतीत 0.22% म्हणजेच 197 रुपये वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव 2027 रुपयांनी घसरून 97726 रुपये झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा व्यवहार ९०७९७ रुपयांवरून सुरु झाला. मात्र लगेचच ९ वाजून १६ मिनिटांनी हा भाव ९१४९९ रुपयांवर पोचला. १० वाजता सोन्याच्या किमतींनी ९१६९६ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. त्यानंतर या किमतीत हळू हळू घसरण सुरु झाली. सध्या २४ कॅरेट १ तोळा सोन्याचा भाव 91050 रुपयांवर व्यवहार करत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये सोन्याच्या किमतीत दररोज चढ उतार बघायला मिळतात त्याचा परिणाम भारतीय बाजारात होतो. सोनं हा सुरक्षित गुंतवणुकीचा योग्य पर्याय असल्याने सोन्याची मागणी वाढत आहे आणि त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर (Gold Price Today) होताना दिसत आहे. भारतात सध्या लग्न सराईतचा काळ असल्याने सोने खरेदीदार ग्राहकांना मात्र वाढत्या किमतीचा फटका बसताना दिसतोय.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 85600 रुपये
मुंबई – 85600 रुपये
नागपूर – 85600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 93380 रूपये
मुंबई – 93380 रूपये
नागपूर – 93380 रूपये
हे पण वाचा : शेअर मार्केटमध्ये भूकंप!! ट्रम्प यांच्या टॅरिफ टॅक्समुळे बाजार गडगडला
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.