Gold Price Today | सोने खरेदी करणे हा ग्राहकांच्या किती जिव्हाळ्याचा विषय असला तरी सध्या तो त्यांनाच परवडताना दिसत नाहीये. गेल्या दोन महिन्यांपासून सोन्या चांदीचे भाव वाढले आहेत. सतत बदलणाऱ्या भावांमुळे सोन्याच्या दागिन्यांची खरेदी नक्की कधी करावी हा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या महागाईचा परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर होत आहे. त्यामुळेच आज (4 सप्टेंबर) देखील सोन्याचे भाव वाढले आहेत. तर चांदीच्या किंमती देखील स्थिर झाल्या आहेत. मात्र या किंमतीत कोणतीही घट झालेली नाही.
Good Return नुसार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी सोन्याच्या किमती (Gold Price Today) प्रचंड वाढले आहेत. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,320 रुपयांनी व्यवहार करत आहे. मात्र यापूर्वी 10 ग्रॅम सोने 60,220 ने व्यवहार करत होते. तर 22 कॅरेट 10 ग्रॅमने 55,200 रुपये व्यवहार करत होते. MCX वेबसाईटनुसार, आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये सुरू आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 60,320 रुपयांनी व्यवहार करत आहे.
सोन्या सोबत सराफ बाजारात आज चांदीच्या किमती देखील वाढलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उच्चांकाची पातळी गाठलेली मौल्यवान चांदी आज मात्र स्थिर आहे. 10 ग्रॅम चांदी आज 769 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7690 रुपयांनी विकली जात आहे. त्याचबरोबर, 1000 ग्रॅम चांदी 76,900 रुपये भावाने सुरू आहे. त्यामुळे चांदीच्या भावात आज देखील कोणते बदल झालेले नाही हे दिसून येत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा दर आजचे भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,300 रुपये
मुंबई – 55,300 रुपये
नागपूर – 55,300 रूपये
24 कॅरेट सोन्याचा आजचे भाव (प्रति 10 ग्रॅम)
पुणे- 60,320 रूपये
मुंबई – 60,320 रूपये
नागपूर – 60,320 रुपये
सध्या देशात पेट्रोल डिझेलच्या किमतीसह रोजच्या वापरातील वस्तू देखील महागले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला चांगली कात्री बसत आहे. अशा त्याचा अनेक सणवार, लग्न समारंभ आल्यामुळे सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जात आहे. मात्र सराफ बाजारातील सोन्या-चांदीच्या किमती वाढल्यामुळे हे सोने ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेले आहे.