हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे . आज खूप दिवसांनी सोन्याच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज ५ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचे भाव 69455 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.23% म्हणजेच 157 रुपयांची घट झाली आहे. खूप दिवसांनी सोन्याची किंमत उतरल्यानंतर खरेदीसाठी हीच ती संधी असं म्हंटल पाहिजे.
MCX वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा व्यवहार ६९५६० रुपयांपासून सुरु झाला. … त्यानंतर सुरुवातीला या किमतीमध्ये वाढ होऊन हाच आकडा ६९६४७ रुपयांवर गेला. मात्र त्यानंतर ११ वाजता अचानक सोन्याचे भाव दणकन खाली आपटले.. सध्या १० ग्राम २४ कॅरेट सोने ६९४५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमती सुद्धा 574 रुपयांनी घसरल्या असून १ किलो चांदीचा भाव आज 79410 रुपये आहे. गुड रिटर्ननुसारही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 64,150 रुपये
मुंबई – 64,150 रुपये
नागपूर – 64,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 69,980 रूपये
मुंबई – 69,980 रूपये
नागपूर – 69,980 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.