Gold Price Today : सोन्याच्या किमती उतरल्या मात्र चांदीच्या दरात वाढ; पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today | पुढच्या महिन्यात राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी आली आहे. या सणा अगोदरच सराफ बाजारात सोन्या चांदीच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आज म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनवेळी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भेटले होते. मात्र आता या किमतींमध्ये घट होताना दिसत आहे. मुख्य म्हणजे, सोन्या चांदीच्या किमती उतरत चालल्यामुळे सराफ बाजारात ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे

गुरुवारी Good Returns नुसार सोन्याच्या किमती (Gold Price Today) उतरले आहेत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,160 रूपये असा सुरू आहे. तर MCX वेबसाईटनुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,590 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,370 रुपयांनी व्यवहार करत आहे. आज MCX वेबसाईटवरील सोन्याचे भाव देखील कमी झाले आहेत.

Gold Price Today
Gold Price Today

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव-

(Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 52,400 रुपये
मुंबई – 52,400 रुपये
नागपूर – 52,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 57,160 रूपये
मुंबई – 57,160 रूपये
नागपूर – 57,160 रुपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

गेल्या दोन दिवसांपासून घसरलेल्या मौल्यवान चांदीचे भाव (Gold Price Today) आज वाढले आहेत. 10 ग्रॅम चांदी आज 711 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदी 7,110 रुपये विकली जात आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 71,100 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भागात 4, 40, 400 अशा रुपयांनी वाढ झाली आहे.

प्लॅटिनमची किंमत

आज प्लॅटिनमची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी देखील दिलासादायक बातमी आलेली नाही. कारण गुरुवारी प्लॅटिनमच्या किमतीत वाढ झाली आहे. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,250 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,32,500 असा सुरू आहे. त्यामुळे आजच्या दिवशी प्लॅटफॉर्म खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकते.