Gold Price Today : एकीकडे उन्हाच्या कडाक्याने सर्वसामान्य माणसाला घाम फुटत असून दुसरीकडे सोन्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशालाही झळ बसत आहेत. लग्नसराईतीच्या या काळात सोन्याच्या वाढलेल्या किमती पाहून ग्राहकांची घोर निराशा होताना दिसत आहे. आज ७ मार्च २०२४ रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गुड रिटर्न नुसार, आज २२ कॅरेट १० ग्राम सोन्याची किंमत ६०२५० रुपये आहे. तर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६५७१० रुपये इतका आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
तर दुसरीकडे, MCX वर आज २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव (Gold Price Today) सकाळी ९ वाजता ६५२३० रुपयांपासून सुरु झाला. त्यानंतर अगदी काही वेळातच म्हणजे ९:३६ ला ६५४४० वर गेला. यानंतर सोन्याची आगेकूच अशीच सुरु राहिली असून सध्या १० वाजता सोने ६५४८६ रुपयांवर व्यवहार करत आहे. १ मार्च पासून दररोज सोन्याच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारे सोन्याचे दर वाढत राहतील असा अंदाज तज्ञानी व्यक्त केला आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,100 रुपये
मुंबई – 60,100 रुपये
नागपूर – 60,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 65,560 रूपये
मुंबई – 65,560 रूपये
नागपूर – 65,560 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.