हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या गुढीपाडवा असून मराठी माणसाच्या नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ती अनेकजण वेगवेगळ्या वस्तूंची किंवा सोन्याची खरेदी करत असतात. मात्र गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे आज ८ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतींनी (Gold Price Today) मोठा उच्चांक गाठला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरवर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याची किंमत 70580 रुपये आहे. कालच्या तुलनेत या भावात 0.4% म्हणजेच 281 रुपयांची वाढ झाली आहे.
MCX वर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा व्यवहार ७०६८० रुपयांपासून सुरु झाला. … त्यानंतर सुरुवातीला या किमतीमध्ये वाढ होऊन हाच आकडा ७०७४५ रुपयांवर गेला. मात्र त्यानंतर ११ वाजता अचानक सोन्याचे भाव (Gold Price Today) कमी जास्त होत आहेत. सध्या १० ग्राम २४ कॅरेट सोने ७०६४९ रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्येही 867 रुपयांची वाढ झाली असून १ किलो चांदीचा भाव तब्बल 81730 रुपये आहे.
Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 65,650 रुपये
मुंबई – 65,650 रुपये
नागपूर – 65,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 71,620 रूपये
मुंबई – 71,620 रूपये
नागपूर – 71,620 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.