Gold Price Today । सध्या भारत आणि पाकिस्तान मध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन हल्ला आणि मिसाईल डागण्यात येत आहेत. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकड्यांच्या प्रत्येक डाव भारत हाणून पाडत आहे, मात्र तरीही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच आहे. युद्धामुळे पाकिस्तानचा बाजार तर उठणार आहेच, परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किमतीकडे सर्वसामान्य लक्ष ठेऊन आहेत. त्यातीलच एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोने….. आज ९ मे २०२५ ला सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव सातत्याने वर खाली होताना दिसतोय. आज, शुक्रवार ०९ मे रोजी, सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम सुमारे १२०० रुपयांची घसरण झाली आहे. MCX वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 96245 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर दुसरीडे गुड रिटर्न नुसार, १ तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत ९८३५० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ९०१५० रुपये आहे. मागच्या काही दिवसांपासून सोन्या- चांदीच्या किमतीत (Gold Price Today) चढउतार पाहायला मिळत आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 90150 रुपये
मुंबई – 90150 रुपये
नागपूर – 90150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 98350 रूपये
मुंबई – 98350 रूपये
नागपूर – 98350 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




