हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने (Gold Price) कोणाला आवडत नाही? सोने प्रत्येकाला आवडत… अंगावर सोनं घालवून इकडे तिकडे फिरवायची हौस अनेकांना असते. परंतु सध्याच्या मार्केट मध्ये सोन्याचे गगनाला भिडलेले भाव बघता सोन खरेदी करणं हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सध्या १ तोळा २४ कॅरेट सोन्याचा दर ९१००० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे सोने खरेदीदार ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसतेय. परंतु आता पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. अमेरिकेतील मॉर्निंगस्टारच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचे दर 38 टक्क्यांनी घसरतील असं म्हंटल जातंय. असं झाल्यास भारतीय ग्राहकांसाठी हि मोठी आनंदाची गोष्ट ठरेल.
किमती घसरण्याचे कारण काय- Gold Price
सध्या सोन्याचा किमतीची वाटचाल लाखोंच्या घरात जाताना दिसत असल्याने सोने खरेदी करावं कि आहे ते सोने विकून चांगले पैसे कमवावेत अशा द्विधा मनस्थितीत अनेक ग्राहक आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमती आता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात. येत्या काळात जवळपास ३८ टक्क्यांनी सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. आणि १ तोळा २४ कॅरेट सोन्याची किंमत ५५ हजार रुपये पर्यंत खाली येऊ शकते. वाढलेला पुरवठा आणि बँकांकडून होणारी खरेदी कमी होणे हे किमती घसरण्याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचा पुरवठा वाढल्याने किमती कमी होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांकडून लावला जात आहे. तसेच सोन्याचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. 2024 च्या दुसर्या तिमाहीत खाणकामामुळं होणारा नफा 950 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे. सोन्याचा जागतिक साठा सुद्धा 9 टक्क्यांनी वाढून 2,16,265 टन झाला आहे.
गेल्या वर्षीबद्दल बोलायचे झाले तर बँकांनी भरपूर सोने खरेदी केले होते. हा ट्रेंड बदलत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी बँकांनी १,४५० टन सोने खरेदी केले होते. यावेळी बँका ७१ टक्के कमी सोने खरेदी करण्याची योजना आखत आहेत. अशा परिस्थितीत मागणी कमी होईल आणि सोन्याची किंमत (Gold Price) कमी होईल. याशिवाय, व्यवसायात आणखी सौदे होण्याचे संकेत आहेत. यामुळे सोन्याचे भाव वाढण्याऐवजी कमी होतील. गेल्या काही महिन्यांत जागतिक अस्थिरता, महागाई आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्धामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर मोर्चा वळवला. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढल्या. मात्र, हे दर किती काळ टिकतील हा प्रश्नच आहे.