हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागच्या काही महिन्यात सोन्याच्या किमतींनी (Gold Price) नवा उच्चांक गाठलाय…. सोने १ लाखांच्या पार सुद्धा गेलं होत, परंतु या महिन्यात सोन्याच्या किमती पुन्हा एकदा कमी कमी होऊ लागल्या आहेत. मागच्या आठवड्याभरत एक तोळा सोन्याचा भाव ७००० ते ८००० रुपयांनी कमी झाला आहे. त्यातच सोने खरेदीदार ग्राहकांना दिलासा देणारी आणखी एक बातमी समोर येत आहे. येत्या 4 ते 6 महिन्यांत सोन्याच्या किमती तब्बल १९००० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी याबाबत दावा केला आहे.
याबाबत सुरेश केडिया यांनी म्हंटल, पुढील ४ ते ६ महिन्यांत सोन्याची किंमत ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. १० ग्रॅम सोन्याची किंमत ८० हजार ते ८५ हजारांच्या दरम्यान दिसते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ शुल्क लादल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, परंतु अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पवित्रा थोडा बदलला आहे. जागतिक तणाव सुद्धा आता स्थिर होताना दिसतोय, त्यामुळे सोन्याच्या किमतीही घसरल्या. येत्या काळात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
यापूर्वी जागतिक तणाव आणि भू-राजकीय घटकांमुळे सोन्याच्या किमती (Gold Price) वाढल्या होत्या. परंतु आता हा तणाव कमी होताना दिसत आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेनमध्ये कायमस्वरूपी युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किंमत कमी होत आहे आणि ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे. बाकी आज 3 मे 2025 रोजी भारतात 24 कैरेट सोन्याचा भाव सुमारे 93,390 रुपये ते 97,310 रुपये प्रति तोळा आहे, तर 22 कैरेट सोन्याचा दर 85,550 रुपये ते 89,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 87550 रुपये
मुंबई – 87550 रुपये
नागपूर – 87550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 95510 रूपये
मुंबई – 95510 रूपये
नागपूर – 95510 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर दर्जाशी कधीही तडजोड करू नका. हॉलमार्क असलेले दागिनेच खरेदी करा, कारण हॉलमार्क हीच सोन्याची सरकारी खात्री आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हे हॉलमार्क प्रमाणपत्र देते. प्रत्येक कॅरेटचे वेगळे हॉलमार्क चिन्ह असते, ते तपासूनच खरेदी करावी. जर तुम्ही हॉलमार्कची खात्री न करता सोने खरेदी केले, तर त्यात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी दागिने खरेदी करताना योग्य तपासणी करा आणि दर्जेदार सोनेच निवडा.




