हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने (Gold Price) म्हणजे भारतीयांची आवडती वस्तू… प्रत्येकाला वाटत कि आपल्याकडे जास्तीत जास्त सोने असावे..खास करून महिलांना सोन्याचे प्रचंड आकर्षण असते. सणासुदीच्या दिवसात आणि खास क्षणानिमित्त आपण सोने खरेदी करतो. काहीजण तर गुंतवणुकीसाठी सोन्याचा पर्याय वापरतात. जर तुम्ही सुद्धा सोन्यात गुंतवणूक करण्याचा किंवा सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर अजिबात उशीर करू नका. कारण आगामी काळात सोन्याच्या किमती प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. काही जाणकारांच्या मते, या वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यांत सोन्याचा भाव गगनाला भिडणार आहे.
खरं तर यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करत सर्वसामान्य मोठा दिलासा दिला होता. कस्टम ड्युटी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव आपोआप कोसळले आणि तब्बल ३००० रुपयांचा फरक प्रति तोळा सोन्याच्या किमतीत पडला. पण अलीकडच्या काळात भारताने पुन्हा सोन्याच्या साठ्यात वाढ केल्याची घोषणा केली आहे, त्यामुळे सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्यातच आता सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत, त्यामुळे सुद्धा सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. आज आपण जाणून घेऊयात अशी काही कारणे ज्यामुळे सोन्याचा भाव आणखी वाढू शकतात.
1) सण आणि लग्नाच्या हंगामाचा परिणाम
यातील पहिले कारण म्हणजे येत्या ३ महिन्यात अनेक सण, उत्सव आणि लगाच्या तारखा आहेत. अशावेळी मागणी वाढल्याने सोन्याच्या भावात सुद्धा नक्कीच वाढ होईल हे नक्की. लग्नाच्या कार्यक्रमात सोने मोठ्या प्रमाणावर खरेदी केलं जाते. त्याचा परिणाम किमतीवर होईल आणि सोने महागले.
2) यूएस रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली- Gold Price
दुसरं कारण म्हणजे, अमेरिकेतील वाढती मंदी लक्षात घेता, अमेरिकन रिझर्व्ह बँक (फेड रिझर्व्ह बँक) व्याजदरात कपात करण्याची घोषणा करू शकते. अशा स्थितीत सोन्याच्या किमतीत झपाट्याने वाढ होऊ शकते. त्याचा फटका भारतीय सराफा बाजारात सुद्धा पाहायला मिळेल आणि भारतातील सोन्याच्या किमती वाढतील.
3) युद्धाचा परिणाम अनेक देशांमध्येही दिसून येईल
तिसरं कारण म्हणजे, सध्या जगातील अनेक देशांमध्ये युद्ध सुरू आहे. यापैकी रशिया-युक्रेन आणि मध्यपूर्वेतील तणावाचा फटका संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती गगनाला भिडण्याची भीती सर्वच देशांना वाटत आहे. त्यामुळेच कि काय अनेक केंद्रीय बँकांनी सातत्याने सोने खरेदी करण्याचा सपाटा लावलाय आणि सोन्याच्या किमती (Gold Price) यामुळे वाढू लागल्या आहेत.